बाजार विभाग

प्रशासन विभाग

  • बाजार समितीचे कायदा, नियम, उपविधी व कर्मचारी सेवा नियम अंतर्गत ठरवुन दिलेली कर्तव्ये व जबाबदारी कायदा कलम 35 व नियम 106 नुसार नेमुन दिलेली कामे पार पाडणे.
  • बाजार समिती संचालक मंडळाचे/उपसमितीचे सभेस कलम 13(छ) प्रमाणे उपस्थित राहुन चर्चेत भाग घेणे व कायदेशीर राहुन चर्चेत भाग घेणे व कायदेशीर मत प्रदर्शित करून अमलबजावणी करणे.
  • अधिसुचना कलम 3,4,5 ची आणि उपविधी व सेवानियम दुरूस्तीची प्रकरणे हाताळणे, न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
  • शासनाचे पत्र व कर्मचाऱ्यांकडून प्राप्त अहवाल संचालक मंडळ सभेत ठेवुन चर्चा करणे व कार्यवाही करणे.
  • निवडणुकी बाबतचे कामकाज पाहणे.
  • मा. प्रशासक/सभापतींनी वेळोवेळी सांगीतलेली व सचिव पदाच्या अखत्यारीतील सर्व कामे व जबाबदारी हाताळणे.
  • समिती संचालक मंडळ सभा, उप समित्याचे सभा मा. प्रशासक/सभापती सुचनेनुसार आयोजन करणे नोटीस काढणे, सभेस उपस्थित राहणे अहवाल वाचन करणे व सभांचे टाचण ठेवणे सामान्य सभेचे इतिवृत्त लिहणे.
  • इतर

आस्थपना विभाग

  • सर्व कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक तयार करून ताब्यात ठेवणे.
  • कर्मचाऱ्यांचे नियुक्ती व पदोन्नती संबंधीने खात्याकडे प्रकरण पाठविणे. जेष्ठता सुची रजिस्टर अद्यावत ठेवणे.
  • सेवा नियम दुरूस्ती प्रकरण करून पाठविणे व दप्तरी ठेवणे व कर्मचारी सेवा नियुक्ती प्रकरण तयार करणे.
  • डेडस्टॉक, टेम्पररी डेडस्टॉक रजिस्टर अद्यावत ठेवणे.
  • बाजार समिती सहकारी संघ, कर्मचारी संघ, पणन मंडळ, आदिवासी विकास महामंडळ इत्यादी सामान्य प्रशासनाचा फाईली हाताळणे व त्यावर पत्र व्यवहार करणे.
  • इतर

बांधकाम विभाग

  • कलम 12(1) ची प्रकरणे हाताळणे.
  • बाजार समितीत होणाऱ्या बांधकामावर नियंत्रण ठेवुन संपुर्ण देखरेखची जबाबदारी पार पाडून सचिवास अहवाल सादर करणे.
  • इतर

लेखा विभाग

  • कर्मचाऱ्यांनी वसुल केलेल्या रक्कमा स्विकारून त्या बँकेत जमा करणे.
  • दैनिक रोजकिर्द, खतावणी व लेखा संबंधी रेकार्ड रोज अद्यावत ठेवणे.
  • मासीक जमा खर्च पत्रक, उत्पन्न खर्च पत्रक, ताळेबंद इत्यादी सहामाई, नवमाही, वार्षिक उत्पन्न खर्चाची पत्रके तयार करून मुदतीत वरिष्ठ कार्यालयास सचिवाचे मार्फत सादर करणे.
  • समितीचे अर्थसंकल्प , वार्षिक अहवाल अंशदान आकारणी, व्यवसाय कर, आयकर, कर्मचारी विमा, कर्ज प्रकरणे, कर्जाची हप्ते, पुरवणी अर्थसंकल्प इत्यादी लेखा विभागाची संबंधीत खात्याकडे भरणा करणे व मुदतीत माहिती मंजुरीस सादर करणे.
  • मंजुर अर्थसंकल्पाचे अधिन राहुन खर्चाची देयके मंजुरीस सादर करणे.
  • लेखा विभागाशी संबंधीत सर्व जमा पावती, पुस्तके, रोकड पुस्तके, खतावणी बुके, खर्चाची व्हावचर, हिशोबाची रजिस्टरे, स्थावर व जंगम मालमत्ता बाबत रेकार्ड इत्यादी आवश्यक रेकार्डची चोरी किंवा गहाळ अथवा खराब होणार नाही यांची दक्षता घेणे व आवश्यकते नुसार वरिष्ठ अधिकारी, लेखापरिक्षक तपासणी अधिकारी यांना वेळीच उपलब्ध करून देणे.
  • कर्मचारी पगार बिल तयार करून मंजुरीस सादर करणे. तसेच कर्मचारी भ.नि.नि. व इतर पगारातुन कपात केलेल्या रक्कमा जमा करणे.
  • मा. प्रशासक/सभापती/सचिव/सहाय्यक सचिव यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे व जबाबदारी पार पाडणे व सचिव व सहा. सचिव यांचे अनुपस्थित सचिव व सहा. सचिवांचे सर्व कामे व जबाबदारी हाताळणे.
  • इतर

अनुज्ञाप्ती विभाग

  • शेतीमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडुन वेळीच चुकारा मिळाले आहे किंवा नाही यांची चौकशी करून त्याप्रमाणे संबंधीतास सुचना करणे व कार्यालयास अहवाल सादर करणे.
  • व्यापाऱ्याकडे शेतकऱ्यांचे शेतीमालाचे वजनमाप बरोबर होत आहे किंवा नाही तसेच हमालाकडून मालाची सांडउबड नासाडी होणार नाही यांची काळजी घेणे व त्याबाबत हमाल संबंधीत व्यापाऱ्यास सुचना देणे कार्यवाही करणे व दैनंदिन व्यवहारावर नियंत्रण ठेवणे.
  • व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेतीमालावर नियमित बाजार फी व शासकीय देखरेख फी ची रक्कम वसुल करून लेखाविभागाकडे जमा करणे. व अवैध खरेदी विक्री वर नियंत्रण ठेवुन बाजार फी व सुपरव्हिजन फी वसुली करणे.
  • व्यापाऱ्यांना प्रसंगी दाखला देणे व वसुल झालेली फी ताबडतोब लेखा विभागाकडे जमा करणे.
  • व्यापारी प्रमाणे शेतीमाल खरेदी बाबतचे हिशोबपट्टी निहाय नोंद रजिस्टर मध्ये घेणे अहवाल तयार करून मासीक आवकेची माहिती तयार करणे. व तपासणी अधिकारी व लेखा विभागास सादर करणे.
  • दैनिक बाजार भाव व जावक मालाची माहिती संगणक विभागास रोजच्या रोज लेखी स्वरूपात द्यावी.
  • बाजार आवारात येणाऱ्या शेतकऱ्यांचे शेतमालाचे लिलाव करणे व लिलावाची प्रक्रिया रोजच्या रोज पार पाडणे.
  • नविन अनुज्ञाप्ती धारकांचे व नुतणीकरणाचे अर्ज स्विकारणे वार्षिक हिशेब ठेवणे अनुज्ञाप्ती फी स्विकारणे अटिच्या पुर्तता बाबत सुचना देणे व आपले अभिप्रायास अनुज्ञाप्ती अर्ज मंजुरीस ठेवणे.
  • शेतकऱ्यांचे शेतमाल तारण योजनेत ठेवुन शेतमालाची योग्य ती जबाबदारी घेवुन योजना राबवने.
  • प्रशासक/ सभापती/ सचिव/सहा.सचिव/ लेखापाल यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
  • इतर

संगणक विभाग

  • सांख्यिकी विभागाला लागणारी माहिती जुळवा जुळव करून ठेवणे व जिल्हा सांख्यिकी विभागाला माहिती देणे.
  • टॅली, दैनिक बाजार भाव व एगमार्क नेट संबंधीचे कामे पार पाडणे.
  • कार्यालयातील आवक-जावक पत्राचे नोंद घेऊन संबंधीत अधिकाऱ्याकडे वेळीच दाखवुन नोंद घेणे व नस्तिकरण करणे.
  • कायदा व नियमानुसार समितीमधील रेकार्ड अद्यावत ठेवणे व अंकक्षेण/ तपासणी अधिकारी यांना मागणीनुसार तपासणीस रेकार्ड उपलब्ध करून देणे.
  • छापील साहित्याचे संपुर्ण हिशोब व साठा ठेवणे आपल्या कडील छापील साहित्याचे इतर कर्मचाऱ्यांना वाटप करणे तसेच विक्री करणे.
  • मुख्य कार्यालय अहेरी अंतर्गत खरेदी करणाऱ्या व्यापारांना दाखला (NOC) देणे.
  • गोदाम करारनामा/नुतणीकरण करणे तसेच गोदाम भाडे वसुली करून लेखा विभागात हिशोब सादर करणे.
  • मा. प्रशासक/ सभापती/ सचिव/सहा.सचिव/ लेखापाल यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनेप्रमाणे कामकाज करावे.
  • इतर