कृषि उत्पन्न बाजार समिती, अहेरी

स्थापना

अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना 23 ऑक्टोबंर 1979 रोजी झाली असुन, महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी –विक्री (नियमन) अधिनियम 1963 व त्या अंतर्गत तयार करण्यांत आलेले नियम 1967 नुसार बाजार समितीचे कामकाज प्रत्यक्षात दिनांक 29 जुन 1984 पासुन सुरू आहे.

समितीचे कार्यक्षेत्र

बाजार समितीचे कार्यक्षेत्र अहेरी, एटापल्ली व भामरागड या तीन तालुक्यातील गावापुरते आहे.

भारत हा कृषि प्रधान देश आहे. या देशातील जवळ जवळ 65 टक्के लोक शेती व्यवसाय करतात कृषि व्यवसाय हा भारतीयांचा जीवन जगण्याचा एकमेव मार्ग आहे. आज एकुण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 60 टक्के हा शेती उत्पन्नापासुन मिळत असुन देशाच्या विकासात शेती ही महत्वाची भुमिका बजावते त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या शेतकरी कणा आहे असे सर्वत्र मानले जाते.

आज शेतकरी वर्षभर अहोरात्र मेहनत करून निसर्गाशी समाना करून आपल्या शेतात पिक घेतो त्यांना पिकविलेल्या शेतमालाला योग्य्ा बाजार भाव मिळावा तसेच त्यांची कोणत्याही घटकाकडुन पिळवणुक न होता त्याला त्यांच्या शेतमालाला योग्य बाजार भाव मिळवुन देण्यासाठी त्यांचे हक्काचे ठिकाण म्हणजे बाजार समिती होय. हाच मुख्य उद्देश बाजार समिती स्थापने मागचा आहे व त्यासाठी बाजार समितीची स्थापना करण्यांत आली तसेच या बाजार समितीमध्ये कोणत्याही प्रकारची अडत न घेता राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम) व्दारे ई-लिलाव केला जात असुन यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल ई-लिलावाव्दारे कमी वेळेत आपला शेतमाल विक्री करीत आहे. बाजार समितीने अहेरी मुख्य बाजार आवारात राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत विविध पायाभुत शेतकऱ्यांसाठी सोयी सुविधा केल्या आहे. तसेच उपबाजार एटापल्ली येथे शेतकऱ्यांचा सोयी सुविधेच्या दृष्टीने विकास कामे करण्यासंबंधी तयारी सुरू असुन, विविध पायाभुत सुविधा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य राहील्यास शेतकऱ्यांना सर्व सोयी सुविधा देण्यास ही बाजार समिती प्रगती करीत राहील.

समितीचे मुख्यबाजार

समितीचे मुख्य बाजार आवार क्रिष्णापुर येथे असुन बाजाराचे क्षेत्र 3.89 हे.आर. आहे. मुख्य बाजार आवारात 200,400,500,250, 1000 मे. टनाचे असे सहा गोदामे बांधलेले आहे, तसेच धान्य चाळण यंत्र उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विहिर, नळ व बोरींग उपलब्ध आहे. तसेच लिलाव शेड, ओपन ओटे, हमाल भवन, शौचालये पुरूष व महिलासाठी वेगवेगळे असुन, दोन्ही बाजुने संरक्षण भिंत आहे व एका बाजुला तारेचा कुंपन करून सिमा बंद केल्या आहेत. शेतकऱ्यांचे शेतीमालावर देखरेख ठेवण्याकरीता सि.सि.टि.व्ही. कॅमेरा बसविण्यात आले. तसेच ईलेक्टॉनिक वजन काट्यवरती वजन व्हावे यासाठी बाजार समितीने ईलेक्टॉनिक वजन काटे पुरविले असुन बाजार समितीचे आवारात 50 मे. टनाचे भुईकाटा बसविण्यात आलेला आहे. महाराष्ट्र कृषि स्पर्धात्मक प्रकल्पातुन दैनिक बाजार भाव पाहण्यासाठी मुख्य ठिकाणी एल.ई.डी बसविण्यात आले, बाजार समितीचे लेखे संगणकावरती समान लेखा पध्दतीचा वापर केला जातो. राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम) योजनेमुळे लिलाव प्रक्रिया ऑनलाईन होत असते. या बाजार समितीचे कार्यक्षेत्र हा आदिवासी भाग असुन या भागात 26 हमीभाव खरेदी केंद्र असुन, सर्व खरेदी केंद्रांना बाजार समिती तर्फे विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहे.

बाजार समिती शेतकऱ्यांकरीता स्वनिधीतून तारण योजना राबविण्यात येत आहे. मुख्य बाजार आवारात लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधकामाकरीताचे प्रस्ताव सादर केले असुन मुक्कामाची व स्वस्त दरात भोजन पुरविण्यासंबंधी योजना सुरू करण्यात येणार आहे. तसेच येणाऱ्या कालावधीत समितीचे आवार संपुर्ण सिमेंटीकरण होणार आहे.

समितीचे दुय्यम बाजार आवार

समितीचे एटापल्ली येथे दुय्यम बाजार आवार असुन त्या ठिकाणी समितीच्या स्वमालकीची 1.02 हे. आर जागा आहे. त्याठिकाणी विविध सोयी सुविधेचे बांधकामे करण्यांचा बाजार समितीचा विचार असुन त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडुन आराखडा मंजुर केलेला आहे. लवकरच नविन कार्यालय व गोदाम उभारणी करून, लिलाव प्रक्रिया व तारण योजना सुरू करण्याचा विचार आहे.

नियंत्रीत शेतीमाल

समितीचे कार्यक्षेत्रात या बाजार समितीने खालील शेतीमाल नियंत्रणाखाली आणलेले आहे. धान, तांदुळ, कापुस, बरबटी, कुलथा, हरभरा, वटाणा, तिळ, मुंग, मोट,मक्का, ज्वारी, सोयाबिन, सुर्यफुल, चवडी, येरंडी, गुरे-ढोरे, शेड्या-मेंढ्या इत्यादी नियंत्रित शेतीमालाची घोषणा केली आहे.

या बाजार समितीचे 75 टक्के कार्यक्षेत्र जंगलांनी व्यापले असल्याने शेतीउपयोगी जमीन फक्त 25 टक्के एवढी असुन, सिंचनाची कोणत्याही प्रकारची सोयी उपलब्ध नसल्याने, शेतकरी निसर्गावर संपुर्णत: अवलंबुन असुन उरलेल्या तटपुंज्या सोयी मध्ये पिक घेत आहे. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात पिके होत नसल्यामुळे संपुर्ण शेतीमाल बाजार आवारात विक्रीस येत नाही.