समितीचे मुख्य बाजार आवार क्रिष्णापुर येथे असुन बाजाराचे क्षेत्र 3.89 हे.आर. आहे. अहेरी बाजार समिीचे कार्यक्षेत्रात अहेरी, एटापल्ली व भामरागड तालुके आहेत. मुख्य बाजार आवारात 200,400,500,250, 1000 मे. टन असे सहा गोदामे बांधलेले आहे, तसेच धान्य चाळण यंत्र उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विहिर, नळ व बोरींग उपलब्ध आहे. तसेच लिलाव शेड, ओपन ओटे, हमाल भवन, शौचालय पुरूष व महिलांसाठी वेगवेगळे आहेत. संपुर्ण बाजार आवराला दोन्ही बाजुने संरक्षण भिंत असुन, एका बाजुला तारेचा कुंपन करून सिमा बंद केल्या आहेत. शेतकऱ्यांचे शेतीमालावर देखरेख ठेवण्याकरीता सि.सि.टि.व्ही. कॅमेरा बसविण्यात आले. तसेच ईलेक्टॉनिक वजन काट्यवरती वजन होत असते, बाजार समितीचे आवारात 50 मे. टनाचे भुईकाटा बसविण्यात आलेला आहे. बाजार समितीचे लेखे हे संगणकावरती समान लेखा पध्दतीचा (टॅली) वापर केला जातो. राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम) योजनेमुळे लिलाव प्रक्रिया ऑनलाईन होत असते. या बाजार समितीचे कार्यक्षेत्र हा आदिवासी भाग असुन कार्यक्षेत्रात 26 हमीभाव खरेदी केंद्र असुन, सर्व खरेदी केंद्रांना बाजार समिती तर्फे विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत असते.
बाजार समिती शेतकऱ्यांकरीता स्वनिधीतुन तारण योजना राबवित आहे. मुख्य बाजार आवारात लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधकाम प्रस्तावाला शासन निर्णय निघाला असुन, पुढील प्रक्रिया सुरू असुन लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात होणार असुन, शेतकऱ्यांना मुक्कामाची व्यवस्था होईल. तसेच स्वस्त दरात भोजन पुरविण्यासंबंधी योजना सुरू करण्याबाबत समिती विचाराधीन आहे. तसेच येणाऱ्या कालावधीत समितीचे संपुर्ण आवार सिमेंटीकरण होणार असुन, ज्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमालाची नासाडी होणार नाही.
