| 1 |
शेतमाल तारण कर्जयोजने अंतर्गत केवळ उत्पादक शेतकऱ्यांचाच खालील शेतमाल स्विकारण्यात यावा :
- तुर
- मूग
- उडीद
- चना
- सोयाबीन
- सुर्यफूल
- करडई
- ज्वारी
- बाजरी
- गहू
- मका
- भात (धान)
- वाघ्या घेवडा (राजमा)
- हळद
- सुपारी
- काजू बी
- बेदाणा
|
| 2 |
शासनाने MSP निश्चित केलेल्या व तारणात ठेवलेल्या 1 ते 12 शेतीमालाची तारण कर्ज रक्कम खालील प्रमाणे निश्चित करण्यात यावी.
कर्ज रक्कम निश्चित - तुर
- मूग
- उडीद
- चना
- सोयाबीन
- सुर्यफूल
- करडई
- ज्वारी
- बाजरी
- गहू
- मका
- भात (धान) या पिंकांची MSP किंमत किंवा प्रचलीत बाजारभाव यापैकी जी कमी असेल त्या रकमेच्या 75 टक्के इतके शेतमाल तारण कर्ज देण्यात यावे.
|
| 3 |
शासनाने MSP निश्चित न केलेल्या व तारणात ठेवलेल्या वाघ्या घेवडा,हळद, सुपारी, काजू बी व बेदाणा या5 शेतीमालाची तारण कर्ज रक्कम खालील प्रमाणे निश्चित करण्यात येते.
कर्ज रक्कम निश्चित
- वाघ्या घेवडा या शेतीमालाची प्रती क्विं. रु.3000/- किमान किंमत किंवा प्रचलीत बाजारभावजी कमी असेल त्या रकमेच्या 75 टक्के इतके शेतमाल तारण कर्ज देण्यात यावे.
- हळद या शेतीमालाच्या प्रचलीत बाजारभावाच्या 75 टक्के इतके शेतमाल तारण कर्ज देण्यात यावे.
- सुपारी या शेतीमालाच्या बाजारभावाच्या कमाल 75 टक्के किंवा जास्तीत जास्त रु.100/- प्रती किलो यातील कमी असणारी रक्कम शेतमाल तारण कर्ज देण्यात यावे.
- काजू बी या शेतीमालाच्या बाजारभावाच्या कमाल 75 टक्के किंवा जास्तीत जास्त रु.100/- प्रती किलो यातील कमी असणारी रक्कम शेतमाल तारण कर्ज देण्यात यावे.
- बेदाणाया शेतीमालाची प्रती क्विं. रु.7500/- किमान किंमत किंवा प्रचलीत बाजारभाव जी कमी असेल त्या रकमेच्या 75 टक्के इतके शेतमाल तारण कर्ज देण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत बेदाण्याचा प्रति किलो दर महा रु. 100/- पेक्षा जास्त विचारात घेऊ नये.
- खरीप व रब्बी हंगामातील शेतमालाची किमान आधारभूत किंमत केंद्रशासनामार्फत दरवर्षी हंगामपुर्व जाहीर करण्यात येते. त्याबाबतची माहिती सचिव यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावी.
|
| 4 |
शेतमाल तारण ठेवण्यासाठी बाजार समिती कार्यक्षेत्र मर्यादा शिथील
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे दि. 28/11/2017 रोजीचे पत्र क्र. कृपमं/शेताकयो/2017-18/अंमलबजावणी/3377/2017 नुसार,बाजार समितीने फक्त कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा शेतमाल तारणात स्विकारावा ही मर्यादा काढून टाकण्यात आलेली असून, ज्या बाजार समिताकडे गोदाम किंवा निधी उपलब्ध नसल्यामुळे तारण योजना राबविण्यात येत नाही. अशा वेळी त्या बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल नजिकच्या शेतमाल तारण राबविणाऱ्या बाजार समितीच्या गोदामात किंवा वखार महामंडळाच्या गोदामात ठेऊन, त्या तारणावर नजिकच्या बाजार समितीने कर्ज वाटप केल्यास त्याची प्रतिपुर्ती कृषि पणन मंडळामार्फत करण्यात येईल.
|
| 5 |
शेतमाल तारण योजनेत समाविष्ट 17 शेतमालाकरीता तारण कर्जाचा किमान, कमाल कालावधी व व्याजदर -
- कर्ज घेतल्यापासून 180 दिवसापर्यंत (6 महिने) कर्जासाठी 6 टक्के व्याजदर राहील.
- कर्ज 180 दिवसांत परतफेड न केल्यास 180 दिवसांनंतर पुढील सहा महिन्यांकरीता 8 टक्के व्याजदर राहील.
- कर्ज एक वर्षात परतफेड न केल्यास एक वर्षानंतर पुढील कालावधीकरीता 12 टक्के व्याजदर राहील.
- कोणत्याही परिस्थिती मध्ये समितीने तारण कर्ज घेतल्यापासून 18 महिन्याचे आत संपुर्ण कर्जाची सव्याज परत फेडकरणे आवश्यक आहे.
|
| 6 |
शेतमाल तारण योजनेअंतर्गत शेतमाल तारण ठेवताना 7/12 वरील सर्व कुटूंबातील सदस्यांनी ज्या सदस्यांच्या नावाने शेतमाल तारण ठेऊन कर्ज घेण्यात येणार आहे त्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने शेतमाल तारण ठेवणे व कर्ज अदा करणे इतर कुटूंबातील सदस्यांची संमती असल्याचे संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे. याची खातरजमा व संमती पत्र घ्यावयाची जबाबदारी ही बाजार समितीच्या सचिवाची असेल.
कुटूंब यामध्ये आई,वडिल,मुलगा, लग्न न झालेली मुलगी, मुलाची पत्नी व मुलाची मुले (नातू) यांचा समावेश असलेला सामाईक अथवा स्वतंत्र 7/12 उतारा ग्राह्य धरण्यात यावा.
|