कृषि उत्पन्न बाजार समिती, अहेरी
अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना 23 ऑक्टोबंर 1979 रोजी झाली असुन, महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी –विक्री (नियमन) अधिनियम 1963 व त्या अंतर्गत तयार करण्यांत आलेले नियम 1967 नुसार बाजार समितीचे कामकाज प्रत्यक्षात दिनांक 29 जुन 1984 पासुन सुरू आहे.
बाजार समितीचे कार्यक्षेत्र अहेरी, एटापल्ली व भामरागड या तीन तालुक्यातील गावापुरते आहे. भारत हा कृषि प्रधान देश आहे. या देशातील जवळ जवळ 65 टक्के लोक शेती व्यवसाय करतात कृषि व्यवसाय हा भारतीयांचा जीवन जगण्याचा एकमेव मार्ग आहे. आज एकुण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 60 टक्के हा शेती उत्पन्नापासुन मिळत असुन देशाच्या विकासात शेती ही महत्वाची भुमिका बजावते त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या शेतकरी कणा आहे असे सर्वत्र मानले जाते.
सर्व माहितीसाठी....
